सावंतवाडीत उबाठा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांचा सहकाऱ्यांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या सावंतवाडीत येत आहेत. सावंतवाडीत येण्यापूर्वी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरेंना धक्का दिला आहे.उबाठा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, उपतालुकाप्रमुख आबा सावंत, संतोष गोवेकर यांच्यासह तब्बल ४०० जणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत मंत्री केसरकर यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला. ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री तथा महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, उपतालुकाप्रमुख आबा सावंत, संतोष गोवेकर, संदीप कोठावळे, कौस्तुभ गावडे आदींसह ४०० जणांनी शिवसेनेत प्रवेश केला.