
बेपत्ता असलेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला
रत्नागिरी तालुक्यातील फणसोप मागलाड येथील बेपत्ता असलेला प्रकाश भाटकर यांचा मृतदेह फणसोप येथे सापडला.प्रकाश भाटकर हे तीन दिवसांपूर्वी रत्नागिरी बाजारपेठेत जातो असे सांगून घराबाहेर पडले होते. परंतु ते घरात न आल्याने त्यांची शोधाशोध सुरू होती. ते बेपत्ता असल्याची फिर्याद पोलिसांकडे देण्यात आली होती. त्यांचा मृतदेह फणसोप स्मशानभूमीच्या मागील बाजूला आढळून आला.
www.konkantoday.com