
योगेश कदम यांच्याविरोधात त्यांचे काका सदानंद ऊर्फ अप्पा कदम हे निवडणूक प्रचारात उतरले…
निवडणुक रणधुमाळीत पुतण्या विरोधात काकांचा प्रचार...
दापोलीत योगेश कदम यांच्याविरोधात त्यांचे काका सदानंद ऊर्फ अप्पा कदम हे निवडणूक प्रचारात उतरले आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता एकतर्फी होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांचे निवडणूकीतील विजयाचे पारडे जड झाले आहे.दापोली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकुण 9 उमेदवार आहेत. मात्र, मुखअय लढत शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम हे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शिंदे गटाचे योगेश कदम या महायुतीच्या उमेदवारांमध्येच होणार आहे. रामदास कदम यांचे सख्खे भाऊ आणि योगेश कदम यांचे काका प्रगतीशील शेतकरी सदानंद ऊर्फ अप्पा कदम पुतण्या विरोधात निवडणूक प्रचारात उतरल्याने दापोली विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीतील महाविकास आघाडीचे पारडे जड झाले आहे.