
कोकण किनारपट्टीवरील सायक्लॉन सेंटरचा प्रस्ताव ७ वर्षे लालफितीत.
बदलत्या वातावरणामुळे कोकण किनारपट्टीला वारंवार चक्रीवादळाचा धोका निर्माण होत आहे. फियानच्या तडाख्यानंतर किनारी भागातील मानवी वस्तीला संरक्षण मिळावे यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्र किनार्यावर तीन ठिकाणी सायक्लॉन सेंटर उभारण्याचा निर्णय झाला. त्याला ७ वर्षे झाली असून, त्याचे अंदाजपत्रक ३ वरून १५ कोटींवर पोहोचले आहे. तरीही त्याला मंजुरी मिळालेली नाही.
हा प्रस्ताव लालफितीत पडून आहे.फियान चद्रीवादळाने जिल्ह्याच्या किनारपट्टीवर थैमान घातल्यामुळे मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आले तरीही किनारी भागातील नागरिकांना सुरक्षित आसरा मिळावा यासाठी सायक्लॉन सेंटरला शासनाने मंजुरी दिली. २०१८ मध्ये दाभोळ, हर्णै, सैतवडे येथे ३ कोटींचे सायक्लॉन सेंटर मंजूर झाले. पत्तन विभागामार्फत या केंद्राच्या उभारणीसाठी निविदा मागविल्या. निविदांना प्रतिसाद मिळाला नाही.www.konkantoday.com