ऐन विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा मोठा गेम, सदाभाऊ खोत यांना बसला धक्का!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु झाली आहे. यंदा महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत निवडणुकीत दिसणार आहे. सध्या राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. तसेच प्रचाराचा धुराळाही उडताना दिसत आहे. सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडत आहेत. तर दुसरीकडे आता विविध पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. आता ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाने रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का दिला आहे.रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी नुकतंच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. पांडुरंग शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. जळगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पांडुरंग शिंदे यांनी रयत क्रांती संघटना सोडण्यामागचे कारणही सांगितले.

“सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर टीका केली होती. पण मला ही टीका पटली नाही. त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला”, असे पांडुरंग शिंदे यांनी सांगितले. “सध्या सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लांब गेलेले आहेत. त्यांचे काम व्यक्ती केंद्रीत झाले आहे”, अशी टीका पांडुरंग शिंदे यांनी केली.सध्या सदाभाऊ खोत यांच्या विषयी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. माझ्या संपर्कात जिल्ह्यातील 25 कार्यकर्ते आहे. तेदेखील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील असा दावा पांडुरंग शिंदे यांनी केला आहे. ऐन विधानसभेत रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का बसला आहे.

सांगलीतील जतमधील परिसरात एका प्रचारसभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीसदेखील व्यासपीठावर उपस्थित होते. “देवेंद्र फडणवीस म्हणाले गायीचं सगळं दूध वासरांनाच देणार. मग शरद पवारांना नववा महिना लागला आणि कळा सुटल्या. ते म्हणाले माझ्या चिल्ल्यापिल्ल्यांचं कसं होणार? शरद पवार साहेब, तुमच्या चिल्ल्यापिल्ल्यांनी कारखाने, बँका, सूत गिरण्या लाटल्या. पण त्यांना मानावं लागेल की एवढं करून आता म्हणतात मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुझा चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा हवाय का?” असं सदाभाऊ खोत म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button