
सिंधुदुर्गची जलकन्या पूर्वा गावडे हिची वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी निवड
क्रीडानगरी पुणे येथे पार पडलेल्या मॉडर्न पेंटेथलोन या जागतिक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी- ओरोस येथील जलकन्या पूर्वा संदीप गावडे हिने ज्यूनियर गटातून राष्ट्रीय स्तरावर सिल्व्हर मेडल मिळवून तिची इंडोनेशिया सबज्युनिअर आणि ज्युनियर इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिप साठो निवड झाली आहे.तिला आतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक बालाजी केंद्रे याचे मार्गदर्शन लाभले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून पूर्वांचे अभिनंदन होत आहे
पुणे येथे पार पडलेल्या मॉडर्न पेंटेथलोन या क्रीडा प्रकारामध्ये १७ वर्षाखालील मुलींच्या गटात पूर्वाने १६०० मिटर रनींग ,२०० मिटर स्विमिंग आणि १६०० मिटर रनिंग करत राष्ट्रीय स्तरावर तीने दुसरा क्रमांक मिळवत सिल्व्हर मेडल पटकवले आहे. तिची आता नोव्हेंबर मध्ये इंडोनेशिया येथे होणाऱ्या मॉडर्न पेंटेथलोन वर्ल्ड चॅम्पियशिप साठो निवड झाली आहे पूर्वांने राष्ट्रीत स्तरावर महाराष्ट्राची जलकन्या म्हणून खेळताना दमदार कामगिरी केल्यामुळे पहिल्यादाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे. त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तिचे कौतुक होत आहे.
www.konkantoday.com