राज्यातील आठ जिल्ह्यांना दोन दिवस पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये गुरुवार व शुक्रवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे देशातील हवामानात पुन्हा बदल होताना दिसत आहे.राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव या आठ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.