योगेश कदम यांच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १५ रोजी दापोलीत.
निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे १५ नोव्हेंबरला दापोलीत येत आहेत. यावेळी महायुतीची महासभा आयोजित करण्यात आल्याची माहिती महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार योगेश कदम यांनी दिली. दापोलीत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन व जाहीरनामा प्रकाशनानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.www.konkantoday.com