माझी लढाई स्वाभिमानाची, अस्मितेची -अर्चना घारे-परब.
मी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, यासाठी माझ्यावर राजकीय दबाव होता. पण जनतेला शब्द दिला होता की रहायचं नाही तर लढायचं आणि जिंकायचं. ते शब्द मला डोळ्यासमोर दिसत होते. हे शब्द खाली पडू द्यायचे नव्हते. कोकणचा आणि सिंधुदुर्गवासियांचा स्वाभिमान, निष्ठा आणि अस्मितेची ही लढाई आहे. त्यासाठीच मी लढत असून ही लढाई जनतेच्या आशीवादाने जिंकणार आहे, असा विश्वास अपक्ष उमेदवार अर्चना घारे-परब यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.www.konkantoday.com