गाफील राहू नका -उदय सामंत यांचा कार्यकर्त्यांना सल्ला.
कोणता नेता कसा आहे हे जनतेला चांगलेच माहित आहे, अशी महाविकास आघाडीच्या उमेदवारावर टीका करताना या निवडणुकीत गाफील राहू नका, असा सल्ला पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुतीच्या चिन्हावर लढत असले तरी ते महायुतीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना मागील निवडणुकीपेक्षा दीडपट अधिक मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.महायुतीचे उमेदवार आमदार निकम यांच्या प्रचारार्थ मंगळवारी पोफळी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, निकम यांनी केलेली विकासकामे व शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांची साथ यामुळे मागील निवडणुकीपेक्षा यावेळी दीडपट जास्त मताधिक्य असेल. आमदार निकम यांनी गेल्या वर्षात ज्या पद्धतीने चिपळूण-संगमेश्वरवासियांची सेवा केली आहे ते पाहता विजय निश्चित आहे.www.konkantoday.com