मिऱ्या गावातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत बाळ माने यांच्या गावातच उबाठा गटाला सुरुंगन

उदय सामंत यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

रत्नागिरी तालुक्यातील उबाठा गटाचे उमेदवार बाळ माने यांच्या मिऱ्या गावात उबाठा गटाला सुरुंग लागला आहे. अमोल विलणकर, घाऱ्या मयेकर, दादा शिवलकर, संदीप शिरधनकार, सुरेंद्र  शिरधनकार, शशांक सावंत आणि ग्रामपंचायत सदस्य रामदास बनप यांच्या पुढाकाराने शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी मंत्री उदय सामंत यांनी या नव्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. त्यांनी यावेळी विरोधकांकडून पसरवले जाणाऱ्या चुकीच्या प्रचारांना चाप लावत सांगितले की, मिऱ्या गावात विरोधकांकडून फेक नेरटीव्ह पसरवलं जात आहे. ज्यांनी एमआयडीसीची मागणी केली होती, तेच आता उबाठा पक्षात गेले आहेत. परंतु आम्ही मिऱ्या गावकऱ्यांसोबत आहोत त्यांच्या सहमतीनेच मिऱ्या गावचा विकास होत आहे आणि भविष्यात होत राहिल अस आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिलं.

या प्रवेशामुळे मिऱ्या गावात शिवसेनेची ताकत वाढली आहे. यामुळे विरोधकांच्या चुकीच्या प्रचाराला उत्तर मिळाले असून मिऱ्या गावाचा विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत सदस्य अनिता शिरधनकर, माझी ग्रामपंचायत सदस्य अनन्या शिवलकर, माझी ग्रामपंचायत सदस्य मृणाली पाटील, ग्रामपंचायत सदस्य राणी भाटकर, अजित शिवलकर, अमित सावत, दिपिका मयेकर, अभि सावंत, सागर कदम, अक्षय सुर्वेनिलम बनप, विशाखा शिवलकर, रोहिणी सुर्वे, आराध्या सुर्वे, पायल चव्हाण, मुन्ना भाटकर, समिक्षा भाटकर यांसह अनेकांनी भगवा ध्वज स्वीकारत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बाळ माने यांच्या मिऱ्या गावातच उबाठा गटाला सुरुंग लागला असून यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button