
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई रुग्णालयात दाखल.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना शनिवारी संध्याकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार, 79 वर्षीय सुभाष घई यांना काल संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.