पालकमंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा रत्नागिरी, दि. 14 (जिमाका) : उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती (स्थळ : पोलीस परेड ग्राऊंड, रत्नागिरी) सकाळी 10.30 वाजता आयुष्यमान आरोग्य मंदिर, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, मिरकरवाडा मोफत दवाखाना उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: मिरकरवाडा नाका, रत्नागिरी) सकाळी 11 वाजता हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे तारांगण येथील आर्ट गॅलरी चे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : तारांगण, माळनाका) दुपारी 12 वाजता उपविभागीय अधिकारी (प्रांत), रत्नागिरी कार्यालयाचे भूमीपूजन (स्थळ : अल्पबचत सभागृहाजवळ, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी ) दुपारी 1 वाजता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जन्मस्थान नुतनीकरण केलेल्या कामाचे लोकार्पण समारंभास उपस्थिती (स्थळ: टिळक आळी, रत्नागिरी) दुपारी 2 वाजता प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथील सर्व इमारतीचे बळकटीकरण करणे या विकासकामाच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी) दुपारी 3 वाजता सिंधुरत्न समृध्द योजना २०२३-२४ अंतर्गत पर्यटन वाढीस चालना देण्यासाठी महिला प्रभाग संघाना टुरिस्ट बसेस च्या वाटप कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी) सायंकाळी 4 वाजता जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत एक मेगा वॅट क्षमतेचा मौजे गोळप ता. जि. रत्नागिरी येथील सौर ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा (स्थळ : मौजे गोळप-सडा, ता. जि. रत्नागिरी) सायंकाळी 5.30 वाजता प्रथम बजाज ऑटो शोरूम रत्नागिरी येथील जगातील पहिल्या सीएनजी मोटर सायकल शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : ए-४३, जे. के. फाईल्स जवळ, MIDC मिरजोळे ) सायंकाळी 6 वाजता श्री रत्नागिरीचा राजा आगमन सोहळ्यास उपस्थिती (स्थळ: साळवी स्टॉप, रत्नागिरी) रात्रौ सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button