कॉंग्रेसच्या आदेशामुळे प्रशांत यादव यांना विजयी करण्यासाठी आम्ही संघटितपणे प्रयत्न करणार -सहदेव बेटकर.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात रत्नागिरी जिल्ह्यात कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नसली तरी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोणीही नाराज होवू नका, असे सांगितले असून त्यामुळे आम्ही कोणीही नाराज नाही. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांना विजयी करण्यासाठी आम्ही संघटितपणे प्रयत्न करणार आहोत. विशेषतः ओबीसी-बहुजन समाजाने यादव यांना सहकार्य करावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी शिक्षण समिती सभापती व कॉंग्रेसचे नेते सहदेव बेटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढताना सुमारे ५२ हजार मते माजी जिल्हा परिषद सदस्य सहदेव बेटकर यांनी घेतले आहेत.www.konkantoday.com