कशेडीचा दुसरा बोगदा डिसेंबरमध्ये खुला होण्याची शक्यता
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील विद्युतीकरणाच्या कामासह अंतर्गत कामे पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे २० सप्टेंबरपासून वाहतूक बंद आहे. बोगद्यानजकीच्या पुलाचे काम सुरू झाल्याने १५ डिसेंबरनंतरच दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.कशेडीचा दुसरा बोगदा ५ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी खुला झाला होता; मात्र बोगद्यात तात्पुरत्या स्वरूपातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात आल्याने गणेशोत्सव संपताच विद्युतीकरणाच्या कामासाठी वाहतूक बंद करण्यात आली होती. कशेडीच्या दुसऱ्या बोगद्यातील विद्युतीकरणासह अंतर्गत कामांसाठी ५० हून अधिक कामगार दिवस-रात्र राबत आहे. सद्यःस्थितीत विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी बोगद्यानजीक पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या ठिकाणी गर्डर बसवण्याच्या कामाला आणखी काही दिवस लागणार आहेत. यामुळे डिसेंबरनंतरच कशेडीचा दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होईल,