अपघाताची मालिका सुरू असताना भोस्ते घाटात दिशादर्शक फलकांचा अभाव.
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील अवघड वळण अपघातांच्या दृष्टीने शापित बनलेलेे असतानाच दिशादर्शक फलकांअभावीही वाहनचालकांची फसगत होत आहे. राष्ट्रीय महामार्ग खात्याकडून भोस्ते घाटात कुठेही दिशादर्शक फलक लावण्याची तसदी घेतलेली नाही. यामुळे भोस्ते अपघातांचे सत्र सुरूच आहे.महामार्गावरील खवटीपासून परशुराम घाटापर्यंतचे चौपदरीकरण पूर्ण झाल्याने वाहनचालकांचा प्रवास सुसाट झाला आहे. वाहनचालकांच्या वेळेची बचत होत असली तरी चौपदरीकरणातील भोस्ते घाट वाहनचालकांसाठी डोकेदुखीच ठरत आहे. घाटातील अवघड वळणावर अवजड वाहतुकीच्या वाहनांना घडणार्या अपघातांची मालिका सुरूच असल्याने वाहनचालकांचा जीव टांगणीवर आहे. भोस्ते घाटातून मार्गस्थ होताना वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहने हाकावी लागत आहेत. www.konkantoday.com