
हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक हल्ला; प्रधानमंत्री मोदी यांच्याकडून तीव्र शब्दांत निषेध
कॅनडाच्या ब्रेम्प्टन भागात रविवार, ४ नोव्हेंबर या दिवशी हिंदू मंदिरावर खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी हल्ला केला. हिंदू धर्माला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्याच्या या प्रकारावर सर्वत्र संताप व्यक्त होत असतांनी संताप व्यक्त होत आहे.पंतप्रधान मोदींनीही याचा निषेध व्यक्त केला आहे. भारतीय उच्चाधिकारी मंदिराला भेट देण्यासाठी आले असताना सदर हल्ला करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “हिंदू मंदिरांवर जाणीवपूर्वक हल्ला केलेला असून राजनैतिक अधिकाऱ्यांना एकप्रकारे धमकाविण्याचा भ्याड प्रयत्न यातून झालेला आहे.” या हल्ल्यानंतर आता कॅनडाने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सांभाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.