
जिल्हा बाल संरक्षण कक्ष रत्नागिरी यांचे मार्फत लांजा येथे ग्राम बाल संरक्षण समिती प्रशिक्षण संपन्न
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष रत्नागिरी यांचे मार्फत लांजा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी येथे लांजा तालुका मधील शिपोशी व भांबेड बीट मधील ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य सचिव अंगणवाडी सेविका २५ व सदस्य २५ पोलीस पाटील यांना ग्राम बाल संरक्षण समिती कामकाज विषयक प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी लांजा तालुका संरक्षण अधिकारी श्री.कांबळे,अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीम.माळी आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमास श्री.प्रदिप मांडवकर संरक्षण अधिकारी संस्था बाह्य यांनी उपस्थितांना गावपातळीवर बालकांच्या काळजी व सरंक्षणासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महसूल गावामध्ये स्थापन झालेल्या ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्त्व ,कार्ये, भूमिका व बालकांचे कायदे याबाबत मार्गदर्शन केले तर बाल संरक्षण विषयक यंत्रणा याबाबत श्री.अनिल गायकवाड संरक्षण अधिकारी संस्था अंतर्गत यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. गायकवाड संस्थात्मक संरक्षण अधिकारी यांनी केले. कार्यक्रमासाठी शिपोशी व भांबेड बीट मधील 25 महसुल गावातील पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका एकूण ५० सदस्य उपस्थित होते.सदर प्रशिक्षण मा.श्री.काटकर-जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, रत्नागिरी व श्रीम.वीर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.प्रशिक्षणा दरम्यान कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
www.konkantoday.com