अबू आझमींचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून जंगी स्वागत, शाखेत बसून नागरिकांशी संवाद; शिवसैनिक प्रचार करणार!
मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार व समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीला उभे राहिले आहेत. यावेळी ते केवळ समाजवादी पार्टीचे उमेदवार नसून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. जागावाटपात मविआने सपाला दोन जागा सोडल्या आहेत. तर राज्यातील इतर सहा मतदारसंघांमध्ये सपाची मविआच्या उमेदवारांविरोधात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. दरम्यान, अबू आझमी हे यंदा शिवाजीनगरप्रमाणेच मानखुर्दमध्येही प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान त्यांनी मानखुर्दच्या पीएमजीपी कॉलनीमधील शिवसेनेच्या शाखेला भेट दिली. यावेळी शिवसैनिकांनी अबू आझमी यांचं जंगी स्वागत केलं.*शिवसेनेच्या शाखेत बसून अबू आझमी यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी व परिसरात राहणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. मानखुर्दमधील शिवसैनिकांचा गेल्या दोन दशकांपासून अबू आझमींबरोबर संघर्ष चालू आहे. असं असतानाही यावेळी अबू आझमी हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यामुळे येथील शिवसैनिकांनी (ठाकरे) अबू आझमींचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.*बालेकिल्ल्यावर अबू आझमींची पकड*मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. २००९ साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ पासून हा मतदारसंघ समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याकडे राहिला आहे. अबू आझमी सलग तीन वेळा येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या मोठी असून त्यावर अबू आझमी यांची पकड आहे. या मतदारसंघात सध्या तरी आझमी यांना कोणी आव्हान देऊ शकेल अशी परिस्थिती दिसत नाही.pic.twitter.com/VvO82hudRG— Abu Asim Azmi (@abuasimazmi) November 4, 2024अब आझमींसमोर नवाब मलिकांचं आव्हानया मतदारसंघातून एकूण ४१ इच्छूकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४ अर्ज बाद करण्यात आले, तर. ३० अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यापैकी आठ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून यंदा येथून २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीने (अजित पवार) येथून नवाब मलिक यांना, तर समाजवादी पार्टीने भाजपाने येथून विद्यमान आमदार अबू आझमी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. यासह शिवसेनेचे (शिंदे) सुरेश पाटील हे येथील महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. दुसऱ्या बाजूला मनसेने जगदीश खांडेकर यांना उमेदवारी दिली आहे.