शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या बेळगाव येथील पर्यटकाचा बुडून मृत्यू.
वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेला बेळगाव येथील पर्यटक पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. विनायक रमेश शिंदे (वय ४४, रा.बेळगाव) असे त्याचे नाव आहे.याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे.सध्या दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने बेळगाव येथील काही मित्र पर्यटनासाठी सिंधुदुर्गात आले होते. हे सर्व सकाळी शिरोडा वेळागर येथील बीज वर पोहोचले. तेथील समुद्राच्या लाटा पाहून हे पाण्यात आंघोळीसाठी उतरले. मात्र यातील विनायक शिंदे यांचा किनाऱ्यापासून काही अंतरावरच पाण्यात बुडून मृत्यू झाला.याबाबत शिरोडा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.