फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण पुण्या मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली.

राज्यासह देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, मात्र या दिवसांमध्ये होणाऱ्या आतिषबाजीमुळे हवेची गुणवत्ता मात्र ढासळते. दिवाळीनंतर पुणे आणि मुंबई या शहरांमधील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळल्याचे समोर आले आहे.पुणे शहरातील हडपसर भागात तर हवा धोकादायक पातळीवर पोहचली आहे. यामुळे नागरिकांचे श्वसनाचे आजार बळावण्याचा धोका आहे. दिवाळी निमीत्त पुणे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. याचा थेट परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होतो.फटक्यांमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण झाले असून अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहचली आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक पुढीलप्रमाणे :शिवाजीनगर – २५४ .भूमकरनगर – १७४ .सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – २९८ . कर्वे रस्ता – २०९हडपसर – २८१. लोहगाव येथील म्हाडा कॉलनी – १५४ हवेची गुणवत्तेचा निर्देशांक जर १ ते १०० पर्यंत असेल तर हवेतील काही प्रदूषणकारी घटकच त्रासदायक ठरू शकतात. पण तोच १०१ ते २०० दरम्यान निर्देशांक असल्यास मुले आणि ज्येष्ठांना श्वसनासाठी त्रास होऊ लागतो. २०१ ते ३०० या दरम्यान निर्देशांक असेल तर सर्वांनाच त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात आणि ३०० पेक्षा जास्तअसल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button