
यंदाच्या हंगामातील जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याची पेटी नाशिकमध्ये दाखल,२५ हजाराचा विक्रमी भाव.
आंबा हे फळ आवडणाऱ्या खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या यंदाच्या हंगामातील जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याची पेटी नाशिकमध्ये दाखल झाली आहे.सध्या आंबा या फळाचा मौसम सुरु होण्यासाठी अजून तीन- चार महिने राहिले आहे मात्र त्याआधीच मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांनी यंदाच्या हंगामातील पहिलीच देवगड हापूसची पेटी नाशिकला थेट ग्राहकापर्यंत पोहचवली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर उत्तम फोंडेकर यांनी चार डझनाची पेटी थेट ग्राहकाला विक्री केली आहे. या पेटीला फोंडेकर यांना २५ हजाराचा विक्रमी भाव मिळाला आहे. फोंडेकर यांनी तिसऱ्यांदा पहीली आंबा पेटी विक्री करण्याचा मान मिळवला आहे. आंब्याचा हंगाम सुरू होण्यासाठी अजूनही तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे परंतु असे असले तरी या वर्षाच्या हंगामातील पहिली पेटी मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार फोंडेकर यांच्या बागेतून नाशिकला पाठविण्यात आली आहे.