म्हाप्रळ-आंबेत पूल अखेर २० ऑक्टोबर रोजी दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला होणार

गेल्या दोन वर्षापासून दुरूस्तीच्या कारणासाठी बंद असलेला म्हाप्रळ-आंबेत पूल अखेर २० ऑक्टोबर रोजी दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती माणगांव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झाली आहे. यामुळे मंडणगडवासियांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे.
रायगड व रत्नागिरी हे दोन जिल्हे या पुलाने एकमेकास जोडले गेले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षापासून पुलाच्या आंबेतकडील बाजूने दुसर्‍या क्रमांकाच्या पिलरच्या कामासाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे मंडणगड व दापोली या दोन तालुक्यातील वाहतूक अन्य मार्गार्ंंनी वळवावी लागली होती. याचबरोबर या मार्गावरून प्रवास करणार्‍या वाहनांसाठी मोफत बोट वाहतुकीचा पर्यायही शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. माणगांव येथील पुलाच्या पिलरचे व नवीन स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे.                        www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button