शिधापत्रिकेद्वारे धान्य उचलीची ग्राहकांना माहिती मिळणार.
शिधापत्रिकेवर दिले जाणारे धान्य योग्य मापात मिळते किंवा कसे याबाबत ग्राहकांना माहिती नसते. तुमच्यासाठी ठरलेला धान्यसाठा किती आहे. त्यापैकी किती उचल झाली, याची माहिती एसएमएसद्वारे ग्राहकांना देण्याचे पुरवठा विभागाने ठरवले आहे. यासाठी शिधापत्रिकेला मोबाईल क्रमांक जोडण्याची मोहीम राज्यभर सुरू आहे. रत्नागिरी जिल्हा या कामात मागासला आहे.राज्यातील सर्व शिधापत्रिका मोबाईल क्रमांकाशी जोडाव्यात, अस धोरण पुरवठा विभागाने ठरवले आहे. शिधापत्रिका धारकांपैकी किमान एक क्रमांकतरी जोडला जावा म्हणून पुरवठा विभाग प्रयत्नशील आहे. या जोडणीमुळे मंजूर धान्यसाठा, उचल केलेले धान्य आदी तपशील ग्राहकांपर्यंत एसएमएसद्वारे पोहोचवण्याचे उद्देश आहेत.www.konkantoday.com