सत्यविजय भिसे यांच्या हत्या प्रकरणात राजन तेलींना मंत्री दीपक केसरकर यांनी छगन भुजबळ यांना फोन करून आरोपी केले-बबन साळगावकर.
जुने शिवसैनिक असलेले सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज (शुक्रवार, १ नोव्हेंबर) माध्यमांशी संवाद साधत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. कणकवली येथील तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सत्यविजय भिसे यांच्या हत्या प्रकरणात राजन तेलींना मंत्री दीपक केसरकर यांनी छगन भुजबळ यांना फोन करून आरोपी केले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.बबन साळगावकर यावेळी म्हणाले, “दीपक केसरकर प्रत्येक निवडणुकीत अपप्रवृत्तीविषयी बोलतात. पाच वर्षांपूर्वी मी जेव्हा त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांचे वक्तव्य होते की अपप्रवृत्ती? या जिल्ह्यातील सर्वांत मोठी अपप्रवृत्ती ही दीपक केसरकर आहेत. दीपक केसरकर यांनी अनेक वेळा पक्ष बदलले आहेत आणि प्रत्येकाला दगा दिला आहे. ज्यांनी त्यांना प्रेम दिले, उपकार केले त्याला त्यांनी दगा दिलाय हा त्यांचा इतिहास आहे. सत्यविजय भिसे खून प्रकरणात राजन तेलींना मंत्री दीपक केसरकर यांनी छगन भुजबळ यांना फोन करून आरोपी केले,” असे ते यावेळी म्हणाले.