
भंपक आणि बोगस वक्तव्य करून कणकवलीची प्रतिमा मलिंन करू नका-माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे.
बेकरीला लागलेली आग आणि त्या आगीने नुकसान झालेल्या व्यापारांचे सांत्वन करण्यापेक्षा उबाठा चे संदेश पारकर अशा दुःखद प्रसंगात सुद्धा राजकारण करतात हे दुर्दैव आहे. कणकवली नगरपंचायतीचा अग्निशमन बंब हा सर्वात उत्तम आडवांन्स टेक्नॉलॉजी असलेला बंब आहे. समीर नलावडे नगराध्यक्ष असताना आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि प्रयत्न तून हा बंब कणकवली साठी मिळाला आहे. रात्री आगीची दुर्घटना घडल्यानंतर आगीचे रौद्ररूप याच बंबाने आटोक्यात आणले आणि नजीकच्या भाजी मार्केटमध्ये व जवळच्या घरांना लागणारी आग रोखण्यात आली. हे सर्व होत असताना संदेश पारकर हे पांढरे कपडे घालून आले त्यांनी पाहिलं आणि ते निघून गेले. आणि टीका केली .त्यांनी अशी भंपक गिरी आजपर्यंत कणकवलीतच ते करत आलेले आहेत.किमान देवगड वैभववाडी त जाऊन अशा वृत्ती चे प्रदर्शन करू नका. भंपक आणि बोगस वक्तव्य करून कणकवलीची प्रतिमा मलिंन करू नका असा सल्ला कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिला.