घराची परवानगी पाहिजे असेल तर आता ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे.

घरांसाठी परवानगीला महसूल खाते आणि नगररचना विभागाकडे खेपा घालण्याचा अनुभव काही नवीन नाही. परंतु राज्य सरकारने १ सप्टेंबरपासून घरांच्या परवानग्या पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात देवू केल्या आहेत. आतापर्यंत २० परवानगी प्रकरणे दाखल झाली असून ती निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात ग्रामस्थच नव्हे तर सरकारी अधिकारीसुद्धा फार जपून ही प्रकरणे हाताळत आहेत. त्यामुळे निर्णयास विलंब होत आहे.रत्नागिरी येथील नगररचना विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, घराची परवानगी आता केवळ ऑनलाईन स्वरूपात मागावी लागेल. ऑफलाईन स्वरूपात म्हणजे प्रत्यक्ष दस्तऐवज हजर करून परवानगीचे कामे होणार नाहीत. तसे दस्तेवज आता स्वीकारले जात नाहीत. लोकांनी पूर्वीप्रमाणेच महसूल खात्यातील सक्षम प्राधिकार्‍याकडे घर परवानगी मागितली पाहिजे पण ती ऑनलाईन स्वरूपात असावी.रत्नागिरी जिल्ह्यात महसूल खात्याकडे सादर झालेले घर परवानगीचे अर्ज अभिप्रायासाठी नगर रचना विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. अशा अर्जांची संख्या आतापर्यंत २० वर जावून पोहोचली आहे. महसूल खात्यातील आणि नगर रचना विभागातील अधिकार्‍यांना ऑनलाईन प्रकरणे हाताळणे ही बाब नवीन आहे. त्यामुळे त्यांच्याकडील निर्णय आस्ते कदम होत आहे. १ सप्टेंबरपासून आतापर्यंत एकही घर परवानगी प्रकरण निकाली निघू शकले नाही. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button