महाविकास आघाडी कडून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पती फहाद अहमद यांना उमेदवारी.
नवाब मलिक यांची कन्या महायुतीकडून अणुशक्ती नगर विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या समोर महाविकास आघाडीकडून अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पती फहाद अहमद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.चार दिवसांपूर्वी फहाद अहमद हे शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय बी चव्हाण येथे आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांची उमेदवारी पक्की केली आहे. फहाद अहमद हे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष होते. मात्र आता ते स्वतः महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवताना पाहायला मिळत आहे. फहाद अहमद पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.महायुतीकडून सना मलिक रिंगणात उतरल्या असून त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने तिकीट दिलं आहे, असं असलं तरी भाजपकडून सना मलिक यांचे वडील नवाब मलिक यांच्यावर नाराज आहेत. तर महाविकास आघाडीने तिकीट दिलेले फहाद अहमद सुरुवातीपासून चळवळीत सक्रीय आहेत. त्यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शविला आहे. 2014 मध्ये या मतदारसंघात शिवसेनेचे तुकाराम काटे निवडून आले होते. यावेळी ते नवाब मलिक यांच्यासमोर लढले होते. या निवडणुकीत नवाब मलिक यांचा पराभव झाला होता. तुकाराम काटे यांना 39,966 मतं पडली होती, तर नवाब मलिक यांना 38,969 मते पडली होती.