जिल्हा माहिती कार्यालयाच्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन विद्यार्थी आणि माध्यमांसाठी संदर्भ म्हणून उपयुक्त – जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह

रत्नागिरी, दि. 28 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली निवडणूक पूर्वपीठिका ही राज्यशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी तसेच माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांसाठी संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल, असे गौरवोद्गार जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा‍धिकारी एम देवेंदर सिंह यांनी काढले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या विधानसभा सार्वत्रिक 2024 निवडणूक पूर्वपीठिकेचे आज जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, एमसीएमसी सदस्य पत्रकार मुश्ताक खान, आकाशवाणीचे योगीराज बच्चे, कोकण रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक शैलेंद्र बापट, कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचीन देसाई उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या या निवडणूक पूर्वपीठिकेत 1962 ते 2019 या कालावधीतील विधानसभा निवडणुकीसदंर्भातील माहिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम, विधानसभा मतदारनिहाय अंतिम मतदारांची आकडेवारी , विधानसभा मतदारनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीसाठी नियुक्त समिती, त्यांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. नियंत्रण कक्ष क्रमांक, निवडणूक आचारसंहिता काय करावे, काय करु नये, प्रचार संबंधितच्या सूचना, पेड न्यूज, प्रेस कौन्सीलची मार्गदर्शक तत्वे, समाज माध्यम वापराबाबत निवडणूक आयोगाच्या सूचना आदींची माहिती देण्यात आली आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी संपादित केलेल्या या पूर्वपीठिकेसाठी जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पुजार आणि कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळ्ये यांची प्रेरणा तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button