रत्नागिरी शहरातील महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न

रत्नागिरी : शहरातील पटवर्धनवाडी येथे राहणार्‍या सौ. हेमांगी चव्हाण यांच्या गळ्यातील मंगळसूत्र स्कूटरवरून आलेल्या अज्ञात चोरट्याने पळवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यातील चव्हाण यांनी आरडाओरड केल्याने चोरटे पळून गेले. सौ. हेमांगी चव्हाण या आपल्या जावू व मुलीसह भेळ खाण्यासाठी घरातून बाहेर पडून रस्त्याने चालत येत असता मागून आलेल्या काळ्या रंगाच्या ऍक्टीव्हा स्कूटरील इसमाने त्यांना धक्का देवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरट्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही व तो तेथून पळून गेला. या घटनेमुळे मंगळसूत्र चोरट्यांनी रत्नागिरी शहरात परत एकदा आपला मोर्चा वळविल्याचे दिसत आहे. त्यामुळे महिलांनी व नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button