
रत्नागिरीतील मराठा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट.
मराठा मोर्चाच्या पदाधिकार्यांनी मनोज जरांगे यांची सदिच्छा भेट घेवून विविध विषयांवर चर्चा केली.मराठा समाज आरक्षणाबाबत राज्य शासनाने अद्यापही धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला नाही. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी राज्य शासनाच्या विरोधात उपोषण, आंदोलन, मोर्चा आदींद्वारे संघर्ष सुरू ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चाच्या प्रतिनिधी केशवराव इंदुलकर, सुधाकर सावंत, प्रताप सावंतदेसाई यांनी मनोज जरांगे यांची भेट घेवून प्रलंबित असलेल्या आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सविस्तर चचां केली.www.konkantoday.com