मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणे यांचा शिवसेनेत प्रवेश.

भाजप नेते आणि नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांनी आज शिवसेनेत प्रवेशे केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे आज संध्याकाळी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार निलेश राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. निलेश राणे कुडाळ मालवणमधून निवडणूक लढवणार आहेत. निलेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेश आणि शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा याची जय्यत तयारी करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button