महाराष्ट्रासाठी पुढील 24 तास धोक्याचे! IMD कडून हाय अलर्ट!
राज्यातील काही भागांत अजूनही पावसाची शक्यता आहे. तर, बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम होण्याचा अंदाज आहे. अशातच आज (23 ऑक्टोबर 2024) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.*महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. येथील तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना पावसाचा जोर कायम राहीला असा प्रश्नही अनेकांना पडलेला आहे. आज मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्यात ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही भागात ऑक्टबर हिटचा तडाखा देखील जाणवू शकतो.रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येथे पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहू शकतो. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा फटका बसणार आहे. कारण IMD ने येथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. त्याचवेळी विदर्भातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, यवतमाळ, वर्धा, भंडार या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता आहे.