सुंदरगडावर लाखो भाविकांच्या साक्षीने जगद्गुरू नरेंद्राचार्यजी यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा- लाखो दिव्यांनी एकाचवेळी औक्षण
नाणीज दि. २२ – सुंदरगडावर लाखो भाविकांनी लक्ष लक्ष दिव्यांनी औक्षण करीत सोमवारी रात्री उशीरा जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा वाढदिवस अपार उत्साहात, जल्लोशात साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतशबाजी झाली. सुंदरगडावर या सोहळ्याचे विलोभनीय दृश्य लाखो भाविकांनी अनुभवले. अंधा-या रात्रीत दिव्यांच्या एकत्रित प्रकाशानेही सारा आसमंत उजळून निघाला.रात्री दहा वाजता हा जन्मोत्सव सोहळा सुरू झाला. सुरुवातीला भरतनाट्यम, गंगा आरती नृत्य सादर केले. यानंतर प.पू. कानिफनाथ महाराज यांनी जगद्गुरू रामानंदायार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याशी साधलेला संवाद चांगलाच रंगला. यामध्ये जगद्गुरू श्री यांनी स्वतःचा आध्यात्मिक जीवन प्रवास व स्वानुभव कथन केले. त्यांनी यावेळी आपल्या गुरूबद्दलच्या आठवणी सांगितल्या. त्या आठवणी, जीवनात करावा लागलेला संघर्ष, त्यातून जिद्दीने पुढे जाणे, हिंदुत्वासाठी केलेले भरीव कार्य असा त्यांचा सारा जीवनप्रवास भाविकांना प्रेरणा देऊन गेला. यावेळी त्यांनी संप्रदायात मला चांगले शिष्य मिळाले ही अभिमानास्पद गोष्ट आहे. सारे कुटुंबही माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले, याचाही आवर्जून उल्लेख केला. यापूर्वी प.पू. कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन झाले. त्यांनी गुरू-शिष्य परंपरा, प्रत्येकाच्या आयुष्यातील गुरूंचे महत्व. गुरू कशासाठी आवश्यक आहेत, हे विषद केले. या वारी उत्सवातील मुख्य जन्मोत्सव सोहळा सुरू झाला. संतपीठावर स्वतः प.पू. कानिफनाथ महाराज व सारे कुटुंबीय, गुरूबंधू, शिष्य, ब्रह्मवृंद, सुवासिनी यांनी ५८ दिव्यांनी जगद्गुरूश्रींचे औक्षण केले. त्याचवेळी संतपीठा समोरील लाखो भाविकांनी घरातून आणलेली निरांजने प्रज्वलीत केली. लाखो दिवे प्रकाशमान झाले. एकाच कुटुंबातील आपसूक सर्वांचे हात हाताला जोडले गेले. सा-यांनी एकाच वेळी औक्षण केले. त्या दिव्यांच्या प्रकाशात सारा परिसर उजळून निघाला. फटाक्यांची आतषबाजी झाली. सर्व भाविकांनी एकच जल्लोष करत महाराजांचा जयजयकार केला. याचवेळी आरती झाली. जगद्गुरू श्रीं यांनी सर्वांना भरभरून आशीर्वाद दिले.या सर्व सोहळ्याला संतपीठावर स्वतः जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज, सकल सौभाग्य संपन्न सौ. सुप्रियाताई, प.पू. कानिफनाथ महाराज, सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराजांचे शिष्य अनंत महाराज, वेगवेगळ्या आखाड्याचे साधूसंत, पाहुणे उपस्थित होते. सुंदरगडावरील मंदिरातील देवतांना साकडे घालून या सोहळ्याची सांगता करण्यात आली. रात्री उशीरा पर्यंत २४ तास महाप्रसाद सुरु होता.फोटो ओळी-श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे सुंदरगडावर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच जन्मोत्सव सोहळा सोमवारी रात्री झाला. यावेळी संतपीठावर त्यांचे औक्षण करताना प.पू. कानिफनाथ महाराज, अनंतगिरी महाराज आदी.——