
राजापूर तालुक्यात 6 जि. प. गट तसेच 12 पंचायत समिती गणांच्या रचनेनंतर त्यावर घेण्यात आलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 13 हरकती प्रशासनाकडून फेटाळण्यात आल्या
स्थानिक स्वराज्य संस्थेतर्गत जिल्हा परिषद गटासह पंचायत समिती गणांच्या पुनर्रचनेत राजापूर तालुक्यात 6 जि. प. गट तसेच 12 पंचायत समिती गणांच्या रचनेनंतर त्यावर घेण्यात आलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे 13 हरकती प्रशासनाकडून फेटाळण्यात आल्याची माहिती येथील तालुका प्रशासनाने दिली.त्यामुळे 6 जि. प. गट आणि त्या अंतर्गत येणार्या 12 पंचायत समिती गणांची रचना कायम रहाणार आहे.
तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट आणि त्या अंतर्गत 12 पंचायत समिती गण यांची नव्याने प्रभाग रचना करण्यात आली होती. त्यानंतर ती प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार एकूण 13 हरकती दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये सर्वाधिक 12 हरकती पाचलमधून होत्या, तर एक हरकत देवाचे गोठणेमधून घेण्यात आली होती.




