
सावंतवाडी मतदारसंघात अर्चना घारे -परब यांना उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे साकडे.
शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आ. राजन तेली यांनी ‘मशाल’ हाती घेत सावंतवाडी विधानसभेसाठी दावा ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेत सावंतवाडी मतदारसंघात अर्चना घारे -परब यांना उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी साकडे घातले.शनिवारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कोकण महिला आघाडी अध्यक्ष अर्चना घारे – परब, जिल्हा महिला अध्यक्षा अॅड. रेवती राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी आदी पदाधिकार्यांनी शरद पवार यांची भेट घेत सावंतवाडी मतदारसंघ अर्चना घारे -परब यांच्यासाठी सुटावा, याबाबत आग्रह केला. या मतदारसंघासाठी अर्चना घारे -परब व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आग्रही आहेत. ही जागा कोणासाठी सुटते व घारे-परब आणि राजन तेली नेमकी काय भूमिका घेतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.