
हाईट खांबाची सतत मोडतोड होत असल्याने कशेडी बोगद्यातील आणखी मजबूत हाईट खांब उभारणार
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून दुतर्फा मार्गस्थ होणार्या अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने बोगद्यापासून काही अंतरावर सलग तीन वेळा उभारलेले हाईट खांब अवघ्या दोन दिवसातच उखडल्याने दुतर्फा वाहतुकीतील गोंधळ कायम आहे. या पार्श्वभूमीवर बोगद्यातून मार्गस्थ होणारी अवजड वाहतुकीची वाहने रोखण्यासाठी आणखी मजबूत हाईट खांब उभारण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.कशेडी बोगद्यातील दुतर्फा वाहतुकीमुळे वाहनचालकांचा प्रवास वेगवान झाला असला तरी दोन्ही बाजूकडील अवजड वाहने मार्गस्थ होत असल्याने वाहतुकीतील गोंधळ कायम आहे. बोगद्यातून दुतर्फा होणार्या वाहतुकीला अटकाव करण्यासाठी बोगद्यापासून काही अंतराावरील पोलादपूर हद्दीतील भोगाव व खेड तालुक्यातील खवटी येथील अनुसया हॉटेल येथे राष्ट्रीय महामार्ग खात्याने सलग तीन वेळा हाईट खांब उभारले. मात्र अवघ्या दोन दिवसातच हाईट खांबांची मोडतोड करत बिनधास्तपणे अवजड वाहतुकीची वाहने मार्गस्थ होत आहेत.www.konkantoday.com