भारतीय जनता पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी ९९ जणांची पहिली यादी जाहीर.
महायुतीतील प्रचंड चर्चेनंतर आणि जागावाटपाचे अंतर्गत समीकरण निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी ९९ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आणि कामठीमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिलेली आहे.अपवाद वगळता बहुतेक विद्यमान आमदारांची तिकीटे भाजपने कायम ठेवलेली आहेत.पुणे जिल्ह्यातून कुणाला उमेदवारी?कोथरूड :- चंद्रकांत पाटीलशिवाजीनगर :- सिद्धार्थ शिरोळेभोसरी :- महेश लांडगेचिंचवड : शंकर जगतापदौंड :राहुल कुलपर्वती : माधुरी मिसाळसोलापूर जिल्ह्यातून कुणाला उमेदवारी?सोलापुरातील भाजपच्या पहिल्या यादीत तीन आमदारांना परत एकदा उमेदवारी..सोलापूर शहर उत्तर मधून विजयकुमार देशमुख, सोलापूर शहर दक्षिण मधून माजी मंत्री सुभाष देशमुख यांना भाजपची उमेदवारी..अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब..भाजपने जुन्याच सहकार्यांवर टाकला विश्वास..हिंगोली जिल्ह्यातून कुणाला उमेदवारी?हिंगोली विधानसभेसाठी भाजपकडून आमदार तानाजी मुटकुळे यांना उमेदवारी घोषितआमदार तानाजी मुटकुळे यांना पक्षाकडून तिसऱ्यांदा हिंगोली विधानसभेसाठी संधीठाणे जिल्हा भाजपा पहिली उमेदवार यादी- ठाणे जिल्ह्यातून भाजपाने पहिल्या यादीत केले १० उमेदवार जाहीर- गोळीबार प्रकरणी जेल मध्ये असलेल्या आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना दिली भाजपाने कल्याण पुर्वेतून उमेदवारी- ठाणे जिल्ह्यातील विद्यमान आठही आमदारांना भाजपाने दिली उमेदवारी- ऐरोली – गणेश नाईक यांना उमेदवारी मिळाली … त्यामुळे शरद पवार गटात जाण्याच्या चर्चेला पुर्ण विराम- तर, बेलापूर मधून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनाच पुन्हा भाजपाने उमेदवारी दिलीये ही जागा गणेश नाईक परीवार मागत होतं त्यामुळे इथे नाईक परीवार काय करतात याकडे पहावं लागेल- ठाणे शहर मतदार संघातून पुन्हा विद्यमान आमदार संजय केळकर यांना उमेदवारी दिलीये- भिवंडी पश्चिम येथे पुन्हा विद्यमान आमदार महेश चौगुले यांना उमेदवारी तर, मुरबाड मधून देखील भाजपा विद्यमान आमदार किसन कथोरे यांना पुन्हा संधी- भाजपाने पनवेल मधून प्रशांत ठाकूर तर उरण मधून महेश बालदी यांना पुन्हा संधी दिलीये- तर, मिरा भायंदर याजागी भाजपाने पहिल्या यादीत उमेदवार दिला नाही विद्यमान अपक्ष आमदार गिता जैन यांना भाजपा उमेदवारी देण्याची शक्यता- ठाणे जिल्ह्यात १८ पैकी ८ आमदार २०१९ च्या निवडणूकीत निवडून आले होतेय