राज्यातील ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याची भाजपाची मागणी

केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर पाच रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी केले. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.केंद्र सरकारने इंधन दरात कपात केल्यानंतर राज्यातही महाविकास आघाडी सरकारने दरात कपात करावी, अशी मागणी होत आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्यातील ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याची मागणी केली आहे.
“केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिजेलच्या किमतीत ५ व १० रुपयाची कपात केली आहे. आता वेळ राज्यातील ठाकरे सरकारची आहे. राज्यात केंद्राप्रमाणे ५ व १० रूपये कपात व्हायलाच हवी, पण त्या बरोबर राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात जे ५ रूपये वाढवले तेही कमी व्हायला हवे,” असं केशव उपाध्ये यांनी ट्विट करून म्हटलंय.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button