
ठाकरे यांनी कितीही पाळीव प्राणी आमच्याबर सोडले तरी त्याचा आमच्यावर फरक पडणार नाही-आ. नितेश राणे.
दर पाच वर्षानंतर असे प्रवेश कोणीतरी करतात. पहिले परशुराम उपरकर होते, नंतर सतीश सावंत आणि आता राजन तेली आहेत. सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्गमध्ये ‘मविआ’कडे एकही उमेदवार नाही, जो आमच्या महायुतीच्या उमेदवाराला हरवू शकेल एकही कडवट शिवसैनिक नाही जो महायुतीच्या उमेदवारासोबत लढू शकतो ही खरेतर आश्चर्याची गोष्ट आहे.उद्धव ठाकरे यांनी कितीही पाळीव प्राणी आमच्याबर सोडले तरी त्याचा आमच्यावर फरक पडणार नाही. जिल्ह्यात भाजप पक्ष भक्कम आहे, असा टोला भाजप प्रवक्ते आ. नितेश राणे यांनी लगावला.कणकवलीत पत्रकारांशी बोलताना नितेश राणे यांनी राजन तेलींच्या पक्षप्रवेशाबाबत वरील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाला उद्धव ठाकरे यांनी फ्लॉवर समजलं काय? आम्ही फायर आहोत हे ठाकरेंनी लक्षात ठेवावे. ते आम्हाला मैदानात हरवू शकत नाहीत म्हणून अशा गोष्टी ते करत असतात. दिवाळीच्या अगोदर फटाकेकसे फोडायचे हे महायुतीच्या नेत्यांना माहीत आहे, असा इशारा आ. राणे यांनी दिला. जेंव्हा आम्हाला मैदानात हरवू शकत नाहीत तेंव्हा संजय राऊत यांच्यासारखे तीनपट आमच्यावर खोटेनाटे आरोप करतात, काहीतरी बोलून आपली प्रसिद्धी करून घेण्याचा त्यांचा खटाटोप असतो, शिवसेना उबाठा ही डी कंपनी आहे काय? असा सवाल राणे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर केला.