या आधी आम्हाला दोनवेळा फसवलं, आता तिसऱ्यांदा फसणार नाही,मनसे तर्फे मी सांगतो कोणतीच उबाठासोबत अजून संवाद नाही-मनसे नेते संदीप देशपांडे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात दिलेल्या मुलाखतीत शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती करण्याचे संकेत दिल्यानंतर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही भाऊ एकत्र येणार का?अशी जोरदार चर्चा सुरु झाली.’ महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या प्रश्नापुढे आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ असल्याचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रीया आल्या.

दरम्यान, आपण मनसेसंदर्भात सकारात्मक पाऊल टाकायला हरत नाही अशी भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. दुसरीकडे, मी केलेल्या वक्तव्याचे चुकीचे अर्थ काढले गेल्याची मिश्कील प्रतिक्रीया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला दिल्यानंतर आता मनसेनेते संदीप देशपांडे यांनी सध्या कुठेही राजकीय युती नसल्याची प्रतिक्रीया दिलीय. युतीबाबत आमच्या मनात शंका असल्याचंही ते म्हणालेत.काल मुंबई तक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मी केलेल्या वक्तव्याचे चुकीचे अर्थ काढण्यात आल्याची प्रतिक्रीया दिल्यानंतर मनसे सेना युतीवर संदीप देशपांडेंनी प्रतिक्रीया दिलीय. ते म्हणाले, – काल जी मुलाखत त्यात ते बोले काय अर्थ काढला.. त्यामुळे कुठे त्यामुळे कुठेही राजकीय युती सध्या नाही.

आमच्या मनात याबाबत शंका आहे.रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन बोलायचे आम्ही सकारात्मक आहोत.खरच युती करायची असेल तर ते चार पाऊल पुढे आले पाहिजे. मनसे तर्फे मी सांगतो कोणतीच उबाठासोबत अजून संवाद नाही.आम्ही जे पाहत आहोत ते फक्त संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषदेमार्फत बघत आहोत.आम्हाला जेव्हा युती करायची होती तेव्हा आम्ही आधी माणूस पाठवला होता. आमची जी इतर लोकांसोबत नाती आहे ती आहे .. आम्ही काहीच लपवत नाही आहे. ही मुद्दाम हवा निर्माण करायची. आधी देखील या लोकांनी हे केलं आहे. सकारात्मक आहे हे बोलून युती होत नसते. स्वतः आधी बाळा नांदगावकर यांना मातोश्री वर पाठवले होते. आमच्याकडून आधीच सांगतो पडद्यामागून किंवा पडद्यापुढून संबंध झालेला नाही. आम्ही सगळ्यांसोबत बोलतो. पवार साहेब यांच्यासोबत पण आम्ही बोलतो. मला वाटत जर तर च्या प्रश्नाला मी आता काय उत्तर देत नाही त्यांनी प्रस्ताव पाठवावं. दोनदा फसवल्यावर माणूस तिसऱ्यांदा फसत नाही..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button