
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राजन तेली यांचा शिवसेनेत प्रवेश.
नारायण राणेंचे कट्टर समर्थक, अशी ओळख असलेले राजन तेली यांनी शिवसेना (यूबीटी) पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतमध्ये हा पक्षप्रवेश ‘मातोश्री’वर झाला.राजन तेली यांचा शिवसेनेत (यूबीटी) प्रवेश हा नारायण राणेंसाठी मोठा धक्का आहे.राजन तेली हे सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) आमदार, मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली हे ठाकरेंचे उमेदवार असणार आहेत.