दिव्यांग सचिनला मिळाली यांत्रिक व्हीलचे आर एच पी फाऊंडेशनचा पुढाकार : झोमटो व पॅकिंग कंपनीत काम.
रत्नागिरी :-कु.सचिन शैलेश शिंदे.वय ३० वर्ष.मु.पो. गणेशगुळे आजाराने अपंग. दोन्ही पायांमधे ताकद कमी.पाय गुडघ्यात वाकवुन बॅलन्स करत चालतो.गावी १० वी पर्यत शिक्षण झाले.२०१२ साली १० वी नापास झाल्यावर शिक्षण बंद केले.घरीच असायचा.वडील शैलेश शिंदे शेती करतात तर आई स्नेहा शिंदे गृहीणी आहेत.एक मोठा भाउ पंकज शिंदे मुंबईत एका कंपनीत जॉब करतो.त्याच लग्न झालेल आहे तो मुंबईतच रहातो. २०१९ साली सचिनच्या वडीलांना आर एच पी फाउंडेशन रत्नागीरीची माहीती मिळाली.त्याच्या वडीलांनी संस्थेचे अध्यक्ष श्री सादिक नाकाडे यांची भेट घेवुन सचिनची सर्व परिस्थीती सांगीतली.त्यांनी सचिनची नाव नोंदणी संस्थेत केली आणी सचिनला कामाधंद्याबाबत काय करता येईल का?ते पहाण्यास सांगीतले.संस्थेचे अध्यक्ष श्री.सादिक नाकाडे यांनी त्यांचे मित्र श्री.अनुपम नेवगी यांच्या फ्रेंण्ड्स फाउंडेशन ऐरोली मुंबईमधे सचिनच्या कामासाठी शब्द टाकला.२०२२ साली सचिनला अनुपम नेवगी यांच्या हायजीन डायपर्समधे डायपर्स सॉर्टिंग आणी पॅकींग करणेसाठी पाठविले.सध्या दोनवर्ष झाली तो तिथेच राहुन काम करतो. सचिनच्या अपंगत्वामुळे त्याला चालत खुप लांबपर्यत बाहेर जाता येत नाही.प्रत्येकवेळी रिक्षाने बाहेर जाणे परवडत नाही.त्यासाठी नाकाडे सरांनी सचिनच्या सोईच्या निओमोशन गाडीसाठी अनुपम सरांना नाव सुचविले.ईम्पॅक्ट गुरु फाउंडेशन,बजाज आणी निओमोशनने मिळुन एक शिबीर आयोजीत केले होते.त्यामधे सचिनचे सिलेक्शन झाले.त्याचे माप घेवुन गाडी बनविली आणी ट्रेनिंग कॅम्पमधे त्याला गाडी देवुन ती गाडी कशी चालवायची याचे ट्रेनिंगही दिले.आता निओमोशन गाडीमुळे सचिनला बाहेर जावुन स्वत:ची कामे करुन येणे सहज शक्य झाले आले.झोमॅटोमधेही तो रिकाम्यावेळेत काम करुन अर्थिकदृष्ट्या सक्षम होवु शकतो.त्यासाठी त्याचे प्रयत्न चालु आहेत.निओमोशन गाडीमुळे सचिनमधला आत्मविश्वास खुप वाढला आहे.सचिन आणी त्याचे पालकही खुप खुश आहेत.ते मनापासुन आरएचपी फाउंडेशन,फ्रेण्ड्स फाउंडेशन,ईम्पॅक्ट गुरु फाउंडेशन,बजाज आणि निओमोशन यांचे आभार मानले.