राजापूर वकील संघटनेच्या वतीने नूतन न्यायाधीश समृद्धी नार्वेकर यांचा सत्कार.

राजापूर : येथील राजापूर वकील संघटनेमार्फत शहरातील नूतन न्यायाधीश झालेल्या समृद्धी नार्वेकर यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात नवनियुक्त नोटरी ॲड. चंद्रशेखर अभ्यंकर, ॲड. प्रशांत पाध्ये, ॲड. पराग मोदी, ॲड. सुशांत पवार, ॲड. अविनाश कुवेसकर, ॲड. तेजस्विनी राणे, ॲड. रोझिना खोपेकर, ॲड. दिलनवाज वस्ता, ॲड. एकनाथ मोंडे, ॲड. सुनील मेस्त्री या सर्वांचाही राजापूर वकील संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला.या वेळी नवनिर्वाचित न्यायाधीश समृद्धी नार्वेकर यांनी आपला संपूर्ण विद्यार्जनाचा प्रवास सर्वांसमोर मांडला.

या वेळी ॲड. मिलिंद चव्हाण, ॲड. स्वाती वालावलकर, राजापूर तालुका वकील संघटनेच्या महिला प्रतिनिधी ॲड. प्राची मराठे, अधिवक्ता परिषदेचे राजापूर तालुकाध्यक्ष ॲड. चंद्रशेखर अभ्यंकर, राजापूर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार, दिवाणी न्यायाधीश सुरज नलावडे, सहदिवाणी न्यायाधीश सौ. स्वरांजली हाके आदींनी मनोगत व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजापूर तालुका वकील संघटनेचे सचिव ॲड. सुशांत पवार व सहसचिव ॲड. राहुल राणे यांनी केले. तर कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन राजापूर तालुका वकील संघटनेचे खजिनदार ॲड. अविनाश कुवेसकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button