
निवडणुकीच्या कामातून दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांना पूर्णपणे वगळण्यात यावे.
दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी काढल्यास त्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामातून दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांना पूर्णपणे वगळण्यात यावे, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे .याबाबतचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी यांना सादर करण्यात आले आहे .या निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांना निवडणूक कामासाठी काढल्यानंतर त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मागच्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांना निवडणूक कामासाठी काढल्यामुळे त्यांना खूप त्रास झाला होता. त्यामुळे ही बाब लक्षात घेता आगामी विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक कामातून दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांना पूर्णपणे वगळण्यात यावे, आणि तशा प्रकारे शासकीय आदेशात सूट मिळावी अशी मागणी या निवेदनाद्वारे संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गोरे यांनी केली आहे .