
गुहागर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीतून भारतीय जनता पार्टीच लढणार.
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच बहुचर्चेत असणारा गुहागर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीतून भारतीय जनता पार्टीच लढणार आणि नुसत लढणार नसुन महायुतीतून भाजपाचा विजय होणार असल्याचे भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी म्हटले आहे.गुहागर विधानसभा मतदारसंघाबाबत नुकत्याच उपमुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष सन्मा.बावनकुळे साहेब आणि कोकणचे पालक सन्मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या सोबत झालेल्या भेटीत गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपालाच मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत या तीनही वरिष्ठानी दिले आहेत.हा मतदारसंघ गेली अनेक वर्ष युतीतून भाजपाच्या नेतृत्वात होता. मध्यंतरीच्या काळात काही बदल झाले असले तरी या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे. या मतदारसंघातून माजी आमदार डॉ. विनयजी नातू हेच पुन्हा नेतृत्व करणार आहेत.