काही झाले तरी येणारी विधानसभा निवडणूक मी सावंतवाडीतून लढणारच-भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली.

मी पक्ष सोडा म्हणून कोणाला सांगणार नाही. मला संघर्ष करायची सवय आहे. मी गरिबीतून येत सगळे काही भोगले आहे. त्यामुळे काही झाले तरी येणारी विधानसभा निवडणूक मी सावंतवाडीतून लढणारच आहे.यासाठी माझे प्रथम प्राधान्य भाजपाला असेल; मात्र पक्षाने तिकीट न दिल्यास पुढचे काय ते ठरवू, अशी रोखठोक भूमिका भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघप्रमुख राजन तेली यांनी सोमवारी भाजपा कार्यकर्त्यांसमोर मांडली.मी दीपक केसरकरांच्या धमक्यांना घाबरत नाही. होय, मी जेलमध्ये होतो; मात्र लोकांच्या प्रश्नांसाठी. ज्यांचे कर्तृत्वच नाही, केवळ सत्ता व स्वार्थासाठी माकडउड्या मारत राजकारण करणाऱ्यांना पक्षनिष्ठा आणि कार्यकर्ते काय कळणार, अशी बोचरी टीका त्यांनी ना. केसरकरांवर केली. तेली यांनी सोमवारी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संपर्क कार्यालयात भाजपा कार्यकत्यांचा मेळावा घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button