
देवरूख नजिकच्या ओझरे येथे बिबट्याचा मुक्त संचार, सीसीटीव्हीत कैद
देवरूख नजिकच्या ओझरे येथे बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. रस्त्यावरून चालणारा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झघला आहे. देवरूख-सायले मुख्य मार्गावर ओझरे गाव वसलेला आहे. विघ्रवली, काटवली, सोनवडे, सायले, बोरसुत, कुळ्येवाशी, किंजळे येथील ग्रामस्थ ये-जा करण्यासाठी देवरूख-ओझरे मार्गाचा आधार घेतात. ओझरे गावात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे, यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. यातच सोमवारी रात्री ११.४५ वाजता बिबट्या योगेश जागुष्टे यांच्या घरासमोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. देवरूख शहरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी देवरूख-ओझरे मार्गाचा अवलंब करतात. मार्गावर बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.