सरळ सेवा भरती अंतर्गत एसटीच्या सेवेत १,०५८ जणांना सामावून घेणार.
सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदांवर सामावून घेतले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली. संबंधित उमेदवारांना नेमणुका देण्याची प्रक्रियादेखील वेगाने सुरू झाली आहे.२०१९ च्या भरतीमध्ये निवड झालेल्यांपैकी अनुपस्थित अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरतीमधील प्रतीक्षा यादीमधील ३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया एसटी महामंडळात सुरू करण्यात येणार आहे. प्रतीक्षा यादीवरील उर्वरित ७२१ उमेदवारांना आवश्यकतेप्रमाणे व रिक्त जागेनुसार राज्य परिवहन सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे परिपत्रक महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी काढले आहे.www.konkantoday.com