शस्त्र बाहेर काढा, क्रांती करा, वचपा काढा’ सर्वांच्या मेळाव्या आधी ‘राज’ गर्जना!

‘दसऱ्याच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राती जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी त्यांनी आगामी निवडणुकी बाबत मोठे वक्तव्य केले आहे.*ही निवडणूक महत्वाची आहे. त्यामुळे या निवडणुकीत तुम्ही बेसावध राहू नका. तुम्ही बेसावध राहाता म्हणून राजकीय पक्ष आपापले खेळ करून जातात. त्यामुळे पुढली पाच वर्ष तुम्हाला पश्चातापा शिवाय काही पर्याय राहात नाही. तुम्हाला गृहीत धरले जात आहे.तुमच्या मतांशी प्रतारणा केली जात आहे. त्यामुळे तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना, मतांशी प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिवकायचा आहे. त्यामुळे क्रांती करा, वचपा काढा असे आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले. शिवाय जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र साकारणाचे स्वप्न मी पाहीले आहे. त्यासाठी सहकार्य करा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद साधवा. यावेळी त्यांनी मोजक्या शब्दात बरेच काही सांगण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचं सोनं गेली अनेक वर्ष लुटलं जातयं. आपण फक्त आपट्याची पानं एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात आपट्याच्या पाना शिवाय काही राहीलं नाही. बाकीचे सर्व जण सर्व लुटून घेवून जात आहे. पण आपल्याला तिकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. कारण आपण स्वता: मध्ये मशगूल आहोत. जाती पातीच्या राजकारणात आपण अडकलो गेलो आहोत असे राज या वेळी म्हणाले.ही निवडणूक दसऱ्याच्या तोंडावर आहे. त्यामुळे तुम्ही आता तरी बेसावध राहू नका. तुम्ही बेसावध राहाता त्याचा फटका तुम्हाला पुढील पाच वर्ष बसतो. राजकीय पक्ष आपला खेळ करून जातात. प्रगती झाल्याचं सांगितलं जातं. पण फक्त पुल बांधणे म्हणजे विकास नाही. विकास हा अकलेने व्हावा लागतो असेही ते म्हणाले. जगभरातले देश प्रगती पथावर आहेत. तर आपण अजूनही चाचपडत आहोत. याचा राग तुम्हाला येत नाही का? तुम्ही त्याच त्याच लोकांना निवडून देत आहात. मग पश्चातापाची वेळ येणारचं असेही ते म्हणाले. तुम्ही बेसावध राहात त्यामुळे वेड्या वाकड्या युत्या, आघाड्या झाल्या. त्यातले काही जण आज बोलतील. एकमेकांची उणीधुणी काढतील. पण त्यात तुम्ही नसाल असेही ते म्हणाले.ऐन मोक्याच्या वेळी तुम्ही तुमचे शस्त्र मॅन करता. निवडणुकांमध्ये मतांचे शस्त्र तुमच्या हातात आहे. पण ते तुम्ही योग्य पद्धतने वापरत नाही. त्याचा वापर मतदाना दिवशी करा. आता संधी आली आहे. तुम्ही आतापर्यंत सर्वांना संधी दिली आहे. आता एक संधी आम्हालाही द्या असा सुचक आवाहनही राज यांनी यावेळी केले. याबाबत उद्या तेरा तारखेला मेळाव्यात बोलणार असल्याचे ते म्हणाले. खरं तर या निवडणूकीत मतदारांनी क्रांती केली पाहीजे. वचपा काढला पाहीजे. त्यासाठी मतदानाचे शस्त्र मॅन करून नका. ते बाहेर काढा आणि व्यक्त व्हा असेही ते म्हणाले.ज्यांना तुम्ही आजपर्यंत जोपासलं त्यांनी तुमच्या बरोबर प्रतारणा केली आहे. तुम्हाला गृहीत धरलं आहे. त्यातून तुमचं नुकसान होत आहे. त्यामुळे तरूण, तरूणी, शेतकरी राज्यातील प्रत्येक व्यक्तीला मी विनंती करतो की या निवडणुकीत बेसावध राहू नका असे आवाहन राज यांनी केले. ज्यांनी तुमच्या मतांची प्रतारणा केली त्यांना अद्दल घडवा असेही ते म्हणाले. मी हेवा वाटावा अशा महाराष्ट्राचे स्वप्न बघतोय. नवा महाराष्ट्र साकारण्याची संधी द्या. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडवून दाखवेन असे राज यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button